Whats new

स्त्री-पुरुष समानतेमुळे जीडीपी २७% वाढेल, आयएमएफने सादर केला अहवाल

male-female

भारतात कमावत्या व्यक्तींमधील स्त्री-पुरुष भेद नष्ट झाला तर अर्थव्यवस्थेत २७ % वाढ होऊ शकते. भारतात सध्या नोकरी करणा-या महिलांचे प्रमाण खूपच कमी आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) एका अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे. जास्तीत जास्त महिलांना नोकरीत आणण्यासाठी पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत वाढ करण्याचा तसेच सामाजिक कामांवर जास्त खर्च करण्याचा सल्लाही दिला आहे.

आयएमएफच्या आशिया-प्रशांत विभागाच्या उपसंचालक कल्पना कोचर म्हणाल्या, भारतात कमावत्या व्यक्तींमध्ये स्त्री-पुरुष यांच्यातील फरक ५० % च्या आसपास आहे. ओईसीडी देशांत हे प्रमाण १२% आहे. भारतातील फरक जास्त असून तो संपुष्टात आणला तर भारताचाच जास्त फायदा होईल. विकसनशील देशांच्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास आणि मुलींच्या शिक्षणावरील खर्चात वाढ केल्यास हा हेतू साध्य होऊ शकतो.