Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सायनाला उपविजेतेपद, चीनच्या ली झुईरुईला विजेतेपद

saina nehwal

गत चॅम्पियन सायना नेहवालला चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवता आले नाही. जगातील माजी नंबर वन खेळाडूचे दुस-यांदा विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिने स्पर्धेत महिला एकेरीचे उपविजेतेपद पटकावले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या ली झुईरुईने एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात २१-१२, २१-१५ अशा फरकाने शानदार एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह चीनची खेळाडू ७००,००० डॉलरच्या बक्षिसाची मानकरी ठरली. तिने ३९ मिनिटांमध्ये गत विजेत्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आणले. त्यामुळे सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दमदार सुरुवात करताना सायनाने पहिल्या गेममध्ये आघाडी मिळवली होती. मात्र, तिला ही आघाडी कायम ठेवता आली नाही. सहाव्या मानांकित झुईरुईने सरस खेळी करून पहिल्या गेममध्ये २१-१२ ने बाजी मारली. यासह तिने लढतीमध्ये आघाडी मिळवली. दरम्यान, पहिल्या गेममधील अपयशातून सावरलेल्या सायनाने पुनरागमनाचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, आघाडीने आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या झुईरुईने दुसरा गेमही जिंकला.

ली चोंग वेई चॅम्पियन
पुरुष एकेरीत मलेशियाचा ली चोंग वेई चॅम्पियन ठरला. त्याने अव्वल मानांकित चेन ला धूळ चारली. त्याने ५० मिनिटांमध्ये एकेरीची फायनल जिंकली. बिगरमानांकित वेईने २१-१५, २१-११ अशा फरकाने विजय मिळवला. तसेच तो उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.