Whats new

झेक प्रजासत्ताक फेडरेशन चषकाचा मानकरी

Fed-Cup-tennis-final

कॅरोलिना प्लिसकोव्हाने आपला एकेरीचा व त्यानंतर स्ट्रायकोव्हा समवेत दुहेरीचा सामना जिंकून झेक प्रजासत्ताकला फेडरेशन चषक स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत झेक प्रजासत्ताकने चारवेळा फेडरेशन चषकावर आपले नाव कोरले आहे.
दुहेरीच्या सामन्यात प्लिसकोव्हा आणि स्ट्रायकोव्हा यानी रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हा व व्हेस्निना यांचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. झेक प्रजासत्ताकने आतापर्यंत एकूण 9 वेळा फेडरेशन चषक पटकाविला आहे. पूर्वाश्रमीच्या झेकोस्लोव्हाकियाने हा चषक पाचवेळा तर त्यानंतर झेक प्रजासत्ताक या नावाने हा चषक चारवेळा घेतला आहे. एकेरी सामन्यात 11 व्या मानांकित प्लिसकोव्हाने रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव केला. या लढतीत रशियाच्या शरापोव्हाने एकेरीच्या सामन्यात झेकच्या क्विटोव्हाचा 3-6, 6-4, 6-2 असा पराभव केला. या अंतिम लढतीतील सलामीच्या एकेरी सामन्यात झेकच्या क्विटोव्हाने रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हावर 2-6, 6-1, 6-1 अशी मात केली होती.