Whats new

2020 पर्यंत भारत मुख्य आर्थिक केंद्र

INDIA

भारत 2020 पर्यंत चीनसारखे जागतिक आर्थिक केंद्र बनू शकते, त्यासाठी पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे. तसेच देशात मोठय़ा प्रमाणावर असलेले लिंग गुणोत्तर दूर व्हायला हवे, असे मत इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ईआययू)ने म्हटले आहे. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे आहे जो जगाला बदलू शकतो. वर्ष 2000 मध्ये चीनने याच प्रकारे जगाला नवीन दिशा दिली होती, असे या अहवालात म्हटले आहे. भारताला या स्थानावर पोहोचण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागू शकतो. मात्र, त्यानंतर तो 2020 मध्ये जागतिक आर्थिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र होईल. भारतात सध्या उद्योगांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्याची यामध्ये महत्त्वाची भुमिका असेल, असे ईआययूचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ शिमोन बॅप्टिस्ट यांनी म्हटले आहे.
भारत आर्थिक आणि विकासाचे मुख्य केंद्र तयार होण्यासाठी भारत सरकारचे महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियान अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून भारत उत्पादन हबच्या स्वरुपात विकसित होऊ शकतो. सध्या चीनने ज्या पद्धतीने उत्पादन तयार करण्याची योजना तयार केली आहे. त्याप्रकारे भारत सध्या विकसित झालेला नाही. त्यामुळे यासाठी भारताला योग्य ते प्रयत्न करावे लागतील. मूलभूत कौशल्ये आणि शिक्षण यामध्ये भारत खूपच मागे आहे. सध्या भारतात लिंग गुणोत्तरामध्ये मोठी तफावत आहे. मुली शिक्षण जरी घेत असल्या तरी नोकऱयांमध्ये त्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. शहरीकरण आणि पायाभूत सुविधा पुरविणे हे भारतापुढील मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलल्यास भारत आर्थिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र होऊ शकतो.