Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जॉन्सनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

MICHEL JHONSON

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. पर्थमध्ये सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटीनंतर जॉन्सनने निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली असून 'आता गुड बाय करण्याची योग्य वेळ आली आहे' अशी भावनिक प्रतिक्रिया त्याने निवृत्ती स्वीकारताना दिली आहे.

भेदक मा-याने फलंदाजांची भंबेरी उडवणारा मिचेल जॉन्सन गेल्या काही सामन्यांपासून फॉर्ममध्ये नव्हता. पर्थमधील कसोटीत जॉन्सनने पहिल्या डावात १५७ धावा देऊन फक्त एकच विकेट घेतली. पर्थ कसोटीतील चौथ्या दिवसअखेर जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली. जॉन्सनने २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात पदार्पण केले. जॉन्सनने ७३ कसोटीत ३११ विकेट घेतल्या आहेत. शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, डेनिस लिली यांच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणा-या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या यादीत जॉन्सन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर १५३ वन डेत जॉन्सनने २३९ विकेट घेतल्या असून ३० टी -२० सामन्यांमध्ये जॉन्सनच्या खात्यात ३९ विकेट जमा आहेत.