Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

केंद्र सरकारकडून एनएससीएन-के संघटन दहशतवादी घोषित

Terrorist

मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणा-या नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलांग (एनएससीएन-के) या नागा बंडखोरांच्या गटाला दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले. सरकारने बेकायदेशीर कारवाया निर्मूलन कायदा १९६७ अंतर्गत एनएससीएन-के, संलग्न संघटना आणि गटांना दहशतवादी जाहीर केले आहे. मार्च २००१ मध्ये शांतता करार करणा-या या गटाने यावर्षी मार्च महिन्यात शस्त्रसंधी करारातून एकतर्फी माघार घेतली होती. भारत-म्यानमार सीमेलगतचे त्यांच्या नियंत्रणात असलेले क्षेत्र परेश बरुआच्या नेतृत्वातील उल्फा गट, आय. के. सोंगबिजितप्रणीत एनडीएफबी सारख्या सशस्त्र संघटनांच्या दहशतवाद्यांसाठी सुरक्षित क्षेत्र असल्याचा आरोप होता.
मणिपूरमध्ये जून महिन्यात लष्कराच्या डोग्रा रेजिमेंट हल्ला करणारी एनएससीएनके म्हणजे नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड खापलांग या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या संघटनेच्या प्रणित सर्व विभागांवर आता दहशतवादी म्हणून अधिकृत शिक्का मारण्यात आला आहे.
गृहमंत्रालयाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, देशद्रोही कृत्ये रोखणारे कायदा कलम 1967 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या संघटनेने आजवर केलेली कृत्ये ही देशद्रोही आणि बेकायदेशीर अशीच आहेत. त्यामुळे एनएससीएनके व तिच्या सर्व विभागांवर बंदी घालण्यात येत आहे. ही संघटना दहशतवादी असल्याचेही जाहीर केले जात असल्याचे म्हटले आहे. 1988 पासून ही संघटना कार्यरत असून भारत आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात नागालँड आणि मणिपूरमध्ये या संघटनेने वर्चस्व निर्माण केले होते. याच संघटनेने जून 4 रोजी भारतीय सेनेच्या डोग्रा रेजिमेंटच्या गस्ती पथकावर आत्मघातकी हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने याचा बदला घेत थेट म्यानमारमध्ये घुसून या संघटनेचा तळ उद्ध्वस्त केला होता. या नंतर संघटनेचा कणाच मोडून पडला. आता सरकारने ही संघटना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी दहशतवादी घोषित केले आहे. त्यामुळे या संघटनेवर कारवाई करणे सोपे होणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.