Whats new

स्टँडर्ड चार्टर्ड बँके’च्या सीईओपदी जरीन दारुवाला

ZARIN DARUWALA

‘स्टँडर्ड चार्टर्ड’ भारतात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेच्या मुख्य अधिकारी पदावर जरीन दारुवाला यांची नियुक्ती केली आहे. तसेच कंपनीने सुनील कौशल यांची विभागीय मुख्य अधिकारी (आफ्रिका आणि मध्य पूर्व) म्हणून नेमणूक केली.

जरीन सध्या आयसीआयसीआय बँकमध्ये व्होलसेल बँकिंग ग्रुपच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. त्यांनी कॉर्पोरेट बँकिंग, प्रोजेक्ट फायनान्स, स्ट्रक्चर्ड फायनान्स, फायनान्शियल इंन्स्टीटय़ूट या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. बँकिंग क्षेत्रातील त्यांचा 25 वर्षाचा अनुभव पाहता जरीन यांना हे पद देण्यात आले आहे. जरीन चार्टर्ड अकाऊंट आणि कंपनीची सचिवपदही सांभाळले आहे. तसेच ‘फॉर्च्यून’ नियतकालिकाच्या 25 सर्वोत्तम महिलांच्या यादीत जरीन यांना स्थान मिळाले होते.