Whats new

इंदिरा गांधी स्मृती पुरस्कार २०१५ जाहीर

Juhi and Nawazuddin

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मोबाइल किरणोत्सर्गाबाबत जनजागृती केल्याबद्दल हिंदी चित्रपट अभिनेत्री जुही चावला, धावपटू कविता राऊत, लेखिका-कवयित्री कविता महाजन, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, शिक्षणतज्ज्ञ फरीदा लांबे, उद्योजक मेघा फणसाळकर आणि पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राही भिडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमारी आणि काँग्रेसचे मुख्य सचिव जनार्दन द्विवेदी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.