Whats new

आयसीसी क्रमवारीत रवींद्र जडेजा १३व्या स्थानी

ravindra jadeja

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत आपल्या गोलंदाजीची छाप पाडणाऱ्या भारताच्या रवींद्र जडेजाने आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी मारली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार तो १३ व्या क्रमांकावर आला आहे. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन या क्रमवारीत अद्याप प्रथम क्रमांकावर कायम आहे. जडेजाने पहिल्या कसोटीत ८ बळी, तर पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या कसोटीतील एका डावात चार बळी घेतले आहेत. जडेजा सध्या भरात असून, कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या रणजी स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली. त्याने ४ सामन्यांत ३८ बळी घेतले आहेत.