Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

कृषी पंपांसाठी सौर ऊर्जानिर्मितीचे २,००० मेगावॅटचे सुधारित लक्ष्य

SUN LIGHT

नजीकच्या काळात शेतीला लागणारी विजेची मागणी सौर ऊर्जेतून बहुतांश पुरविली जाऊ शकेल, अशी शक्यता वधारली असल्याचे संकेत केंद्रीय नवीन व अक्षय्य ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव तरुण कपूर यांनी दिली. परिणामी केंद्राने या ऊर्जेचे लक्ष्यही सध्याच्या १००० मेगावॅटवरून दुप्पट म्हणजे २००० मेगावॅट नेणारी सुधारणा केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेषत: विजेवर चालणारे देशातील पाच ते सात लाख कृषी पंप हे लवकरच सौर वीज वापरू लागतील. या आघाडीवर महाराष्ट्राच्या सुरू असलेल्या प्रगतीचा कपूर यांनी कौतुकाने उल्लेख केला. २०२२ पर्यंत राज्यातील पाच हजारांहून अधिक कृषी पंपांसाठी सौर ऊर्जा वापरण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य महाराष्ट्राने ठेवले आहे. छपरांद्वारे सौर विजेची देशातील निर्मिती २०२० पर्यंत ६.५ गिगावॅटपर्यंत वाढण्याचा अंदाज ‘ब्रिज टू इंडिया’ या सल्लागार संस्थेचे प्रमुख मुदित जैन यांनी व्यक्त केला.

सौर ऊर्जा उद्यानांच्या केंद्राच्या योजनेतून निर्धारित २० हजार मेगावॅट लक्ष्याच्या तुलनेत १८,५०० मेगावॅटच्या प्रकल्पांना एनटीपीसीने मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातून शिर्डी आणि ठाणे येथे प्रत्येकी ५०० मेगावॅट क्षमतेची दोन सौर ऊर्जा उद्याने उभी राहणे अपेक्षित आहे. शिवाय आणखी दोन उद्यानांसंबंधी चाचपणी सुरू असून, निर्धारित २०,००० मेगावॅटचे लक्ष्य लवकरच गाठले जाईल, तर पुढील वर्षांपर्यंत देशात किमान पाच-सहा विशाल स्थापित क्षमता असलेले प्रकल्प कार्यान्वित होतील.