Whats new

प्रभावी १०० महिलांच्या यादीत सात भारतीय

BBC's aspirational women's list

भारतीय महिलांची क्षमता आणि कर्तृत्वाचे दर्शन पुन्हा एकदा जगाला घडले आहे. गायिका आशा भोसले, टेनिस खेळाडू सानिया मिर्झा, ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांच्यासह सात भारतीय महिलांची निवड बीबीसीने खूप प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत केली आहे.

राजकारण, विज्ञान आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रभावशाली, जागतिक नेत्या असलेल्या व तुलनेने कमी लोकप्रिय परंतु महत्त्वाकांक्षी अशा १०० महिलांची यादी बीबीसी दरवर्षी करीत असते. इतर भारतीय महिलांध्ये रिम्पी कुमारी (शेती), मुमताज शेख (कॅम्पेनर) स्मृती नागपाल आणि कनिका टेकरीवाल (जोखीम घेऊन उद्योग सुरू करणारा) यांचा समावेश आहे. प्रतिकूल परिस्थितीत या महिलांनी कठोर परिश्रम घेऊन आपली यश कथा जगाला सांगितली आहे. आशा भोसले यांनी एक हजार चित्रपटांतील गीतांना आवाज दिला आहे. कामिनी कौशल यांनी १०० पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांत अभिनय केला आहे. राजस्थानात रिम्पी कुमारी यांनी वडिलांच्या निधनानंतर बहिणीला सोबत घेऊन ३२ एकर शेती केली. सानिया मिर्झा यशस्वी टेनिसपटू आहे. स्मृती नागपालने भारतात चिन्हांच्या भाषेत मोठे कार्य केले आहे. जगातल्या बहिऱ्यांना या भाषेचा उपयोग होतो.