Whats new

युएनएचसीआर संघटनेला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार

INDHIRA GANDHI

सीरिया आणि इराकमधील संघर्षग्रस्त परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्वासितांसाठी काम करणा-या संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स हाय कमिशन फॉर रिफ्युजी (युएनएचसीआर) या संघटनेच्या कार्यालयाला 2015 वषासाठीचा प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता, शस्त्रकपात आणि विकास पुरस्काराची घोषणा करण्यात आली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी हा निर्णय घेतल्याचे इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचे सचिव सुमन दुबे यांनी सांगितले. लाखो निर्वासितांना गरजेवेळी ही संघटना मदतीसाठी धावली आहे. तसेच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही संघटना कार्य करत आहे. दुसऱया महायुद्धानंतर असहाय्य लोकांना मदत करण्यासाठी या संघटनेची स्थापना 14 डिसेंबर 1950 रोजी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेकडून करण्यात आली. 1986 मध्ये इंदिरा गांधी पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून 25 लाख रोख रक्कम आणि पारितोषिक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आंतरराष्ट्रीय शांतता, विकास तसेच मानवी समुदायाच्या आर्थिक सुलबतेसाठी कार्य करणा-यांना हा पुरस्कार देण्यात येतो.