Whats new

नितीशकुमार पाचव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

NITISH KUMAR

भाजपाचा दणदणीत पराभव करून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महागठबंधनचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली. पाटण्यातील गांधी मैदानात पार पडलेल्या या सोहळ्यात महागठबंधनचे नेते लालू प्रसाद यादव कुटुंबियासह उपस्थित होते. तसेच नीतिश कुमार यांच्या निमंत्रणाचा मान राखून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी , जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक व ओमर अब्दुल्ला, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह इतर अनेक दिग्गज उपस्थित होते. भाजपातर्फे व्यंकय्या नायडू यांनी शपथविधी सोहळ्यास हजेरी लावली.

नीतिशकुमार यांच्यानंतर लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुले तेजस्वी व तेज प्रताप यादव यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र थपथ घेताना शब्दोच्चार चुकल्याने तेजप्रताप यादव यांना दुस-यांदा शपथ घ्यावी लागली. तेजस्वी् यादव, तेज प्रताप यादव, अब्दुल बारी सिद्दिकी,विजेंद्र प्रसाद यादव,राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह,श्रवण कुमार,जय कुमार सिंह,कृष्णनंदन वर्मा,महेश्वर हजारी,अब्दुल जलील मस्तान,राम विचार राय,शिवचन्द्र राम,मदन मोहन झा,आलोक कुमार मेहता,चंद्रिका राय,अवधेश कुमार सिंह,शैलेश कुमार,संतोष निराला,मुनेश्वर चौधरी,डॉ. अब्दुल गफ्फूर,डॉ. चंद्रशेखर,अनिता देवी,विजय प्रकाश,मदन सहनी,कपिल देव कामत,मंजू वर्मा,अशोक चौधरी,खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

Next >>