Whats new

भारताच्या आशू शर्माला परस्यूट प्रकारात ब्राँझ

Aashu sharma

कुमार गटात भारताच्या मुलींनी ट्रॅक आशिया करंडक सायकलिंग स्पर्धेत दुसऱ्या दिवशी आणखी एका ब्राँझपदकाची कमाई केली. मात्र, मुलांना पदकापर्यंत पोचण्यात अपयश आले. दोन कि.मी. परस्यूट प्रकारात भारताच्या आशू शर्मा हिने दोन तास ४७.६५२ सेकंद अशी वेळ दिली. तिला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले.

भारतातून स्वतंत्रपणे स्पर्धेत उतरलेल्या साई नॅशनल सायकलिंग ॲकॅडमीच्या टी. देवी विद्यालक्ष्मी हिने महिलांच्या तीन कि.मी. परस्यूट प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. याच प्रकारात वेस्टर्न इंडिया या भारताच्या दुसऱ्या स्वतंत्र संघातून सहभागी झालेली पुण्याची ऋतुजा सातपुते ब्राँझपदकाची मानकरी ठरली. आज दुसऱ्या दिवशी चार स्पर्धा प्रकारांच्या अंतिम शर्यती झाल्या. यामध्ये भारताला केवळ एक ब्राँझ पदक मिळाले. पदक तालिकेत भारत एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन ब्राँझ पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. कोरियाने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझ पदकासह अव्वल स्थान पटकावले आहे.

Next >>