Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

‘एचआयव्ही’ च्या उपचारासाठी ‘डी’ जीवनसत्त्वाची आवश्यकता

aids

शरीरातील डी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच एड्सबाधित रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असून एचआयव्हीग्रस्त रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशीच्या उत्पत्तीवरदेखील परिणाम करीत असल्याची माहिती एड्सविषयक संशोधनातून पुढे आली आहे. मानवी शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतांवर आघात करणारा विषाणू एचआयव्हीच्या प्रादुर्भावाने शरीरात रोगजनकांच्या उत्पत्तीवरच विपरीत परिणाम होतो.

रोगपरिस्थिती विज्ञान व जैविकशास्त्राच्या अभ्यासक आणि अमेरिकेच्या जॉर्जिया विद्यापीठाच्या प्रोफेसर अॅमेरा ईजेमामा यांनी याविषयी मत मांडताना एचआयव्हीबाधित रुग्णाच्या रोगप्रतिकारक पेशीचे मोजमाप साधारणपणे सी.डी.४+टी या पद्धतीने केले जाते. कारण एचआयव्हीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना नष्ट करून रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. यामुळेच अॅन्टीरेट्रोव्हायरलथेरपीने रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशीमध्ये वाढ करताना एचआयव्हीग्रस्त रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढवण्याचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे मत ईजेमामा यांनी व्यक्त केले. यासाठी ०,३,६,१२ आणि १८ महिने एचआयव्हीग्रस्त रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशीचा अभ्यास केला गेला. या परीक्षणातून शरीरात डी जीवनसत्त्वामुळे सी.डी.४+टी या पेशीमध्ये कमालीची वाढ झाल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे एचआयव्हीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी टी पेशीची वाढ फारच उपयुक्त ठरत असल्याचा निष्कर्ष पुढे येत आहे. कारण एचआयव्हीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर हा विषाणू शरीरातील सी.डी.४+टी पेशीवरच मुख्यत्वे करून आघात करतो.

ईमेंजा यांनी या थेरपीमधून विविध औषधांचा एकत्रितपणे मारा करताना एचआयव्हीच्या विषाणूला नियंत्रित केले जाते. तसेच निरीक्षणात शरीरातील डी जीवनसत्त्वाच्या अस्तित्वामुळे सी.डी.४+टी पेशीची संख्या साधारण ६५ टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. एचआव्हीचे विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना नष्ट करतात पण शरीरातील डी जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत, असा निष्कर्ष अभ्यासातून पुढे येत आहे. त्यामुळे डी जीवनसत्त्व आणि सी.डी.४+टी पेशीमध्ये एचआयव्ही विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात साधम्र्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एचएएआरटी ही थेरपी नक्कीच एड्सग्रस्ताच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. या संशोधनामुळे येणाऱ्या काळात एड्सच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यात यश मिळण्याची अपेक्षा ईमेंजा यांनी व्यक्त केली आहे.

Next >>