Whats new

जोकोविचने पटकावले 2015 मधील एटीपी वर्ल्ड टूर टायटल्सचे जेतेपद

novakdjokovic

एटीपी वर्ल्ड टूर टायटल्सच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररला नमवून नोवाक जोकोविचने स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेचा माजी विजेता असलेल्या स्वित्झर्लँडच्या फेडररचा सर्बियाच्या जोकोविचने ६-३,६-४ असा पराभव करत पुरूष एकेरीचे जेतेपद सलग चौथ्यांदा पटकावत यावर्षाची विजयी सांगता केली.

सलग चार वर्ष घरी विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जाणारा जोकोविच हा ४६ वर्षातूल पहिलाच खेळाडू ठरला आहे. २८ वर्षीय जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये अँडी मरेचा तर विम्बल्डन व यू.एस ओपनमध्ये रॉजर फेडररचा पराभव करत तीन ग्रँड स्लॅम स्पर्धेची विजेतेपदे पटकावली. फ्रेंच ओपनमध्ये स्टॅन वावरिंकाने त्याचा पराभव केल्याने त्याचे चौथे ग्रॅंडस्लॅमपद हुकले.

Next >>