Whats new

भारत-सिंगापूरमधील संरक्षण सहकार्य सोबत 10 विविध करार

India-Singapore

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यात भारत व सिंगापूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘व्यूहात्मक भागीदारीं’ अंतर्गत 10 विविध करार करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या करारांतर्गत संरक्षण, सायबर सुरक्षा आणि नागरी हवाई क्षेत्रामधील सहकार्याचा विकास करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. याचबरोबर नागरी विकास आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणी संदर्भातील द्विपक्षीय करारही करण्यात आले.

मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली हसेन लूंग आणि सिंगापूरचे राष्ट्रपती टोनी टान केंग याम यांचीही यावेळी भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सध्याचे जागतिक राजकारण व भारताच्या एकंदर आग्नेय आशियासंदर्भातील परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनामधून पंतप्रधानांचा हा विदेश दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे..

Next >>