Whats new

ऋतुजा बक्षीची जागतिक स्पर्धेसाठी निवड, राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम

RUTUJA BAKSHI

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची उदयोन्मुख खेळाडू ऋतुजा बक्षीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत ती सहाव्या स्थानावर राहिली. मुलांमध्ये कर्नाटकच्या अजिथ एम. पी. याने पहिला क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे दोघांची ग्रीस येथे एप्रिल २०१६ मध्ये होणारे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. गतवर्षी औरंगाबादच्या साक्षी चितलांगेने या स्पर्धेत जागतिक विजेतेपद पटकावून सर्वांचे लक्ष वेधले होते.

या स्पर्धेत जिल्ह्यातील सुधांशू निकमने १५५ रेटिंग मिळवण्याची उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचप्रमाणे सुधांशूसह जतीन देशपांडे, तनिषा बोरामणीकर, मिताली पाटील आणि सम्यक पटौदी यांनी शानदार प्रदर्शन केले.

Next >>