Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव २७-२८ नोव्हेंबरला रत्नागिरीत

KIRLOSKAR AWARDS

पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज अधोरेखित करणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २७ व २८ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अॅडव्होकेट विलास पाटणे आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आज येथे या महोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकाराने हा महोत्सव महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये आयोजित करण्यात येतो. त्यात सुमारे २५ शहरे सहभागी होतात.

कोकण विभागात फक्त रत्नागिरी शहरातील गोगटे-
जोगळेकर महाविद्यालयात हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित विशिष्ट विचारांचा प्रसार करणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामध्ये यंदा ‘शून्य कचरा’ व्यवस्थापन हे महोत्सवाचे मुख्य सूत्र आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन किंवा पुनर्वापराचे कंपनीमध्ये राबवले जात असलेले उपक्रम पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रात घनकचरा व सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन किंवा पुनर्वापर करणाऱ्या गद्रे मरिन एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची यंदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Next >>