Whats new

आदिवासींसाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 1 डिसेंबरपासून सुरू होणार

amrut yojna

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणाऱ्या "भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजने‘ला गत आठवड्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. असून, ही योजना येत्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 

स्त्रियांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत चौरस आहार देण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविका आपापल्या क्षेत्रातील गरोदर तसेच स्तनदा मातांची यादी तयार करतील. गावपातळीवर ग्रामसभेकडून आहार समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार. या समितीवर एक गरोदर महिला तसेच स्तनदा मातेचीही निवड करण्यात येणार आहे. गहू तांदूळ, अंडी, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या, आयोडिनयुक्त मीठ, गूळ आदींची खरेदी ही सीमती करणार आहे. याशिवाय लाभार्थ्यांची उपस्थिती, आहाराचा दर्जा, स्वच्छता यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या समितीवर राहील.. 

Next >>