Whats new

‘कॉमन मॅन’ बनला ग्वाटेमालाचा अध्यक्ष!

Jimmy morrales

माजी विनोदवीर आणि राजकारणाचा काहीही गंध नसलेले जिमी मोराल्स (४६) यांची ग्वाटेमालाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. स्वत:ला सर्वसामान्य माणूस समजणारे मोराल्स यांना त्याच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सॅण्ड्रा टोरस यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली आहेत.

एकेकाळी हास्यअभिनेते असलेले मोरल्स यांनी निवडणुकीच्या काळात भ्रष्टाचार संपवण्याचे वचन जनतेला दिले होते. त्याचाच प्रभाव जनतेवर पडल्याने मोराल्स यांचा विजय झाला. मोराल्स यांना ६७.४ टक्के मते मिळाली तर टोरस यांना ३२.६ टक्के मते मिळाली. मला मिळालेला विजय हा आशावादाचा आहे. भ्रष्टाचार दूर करण्यासाठीच जनतेने मला निवडून दिले आहे. माझ्याकडे कोणतीही जादू नाही. आपण सर्वानी एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊ, असे आश्वासन मोराल्स यांनी जनतेला दिले.

Next >>