Whats new

दक्षिण कोरिया व अमेरिकेत अणुसंबंधातील नवा करार

USA-SOUTH KOREYA

आगामी 20 वर्षांमध्ये भरीव परिणाम दिसण्याच्या दृष्टीने दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यामध्ये नवीन आण्विक करार झाला. यामुळे 1972 चा करार संपुष्टात आला असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. या नवीन कराराने अण्वस्त्रबंदीची जुन्या करारातील अट चालू राहिली आहे. दक्षिण कोरिया आण्विक इंधनाच्या शोधात असून या करारामुळे आण्विक शक्तीच्या खर्चाला आळा बसणार असून रिऍक्टरांच्या निर्यातीस उत्तेजन मिळणार आहे.

अमेरिकेने ही अट घालण्याचे कारण म्हणजे या आण्विक शक्तीचा उपयोग शस्त्र बनविण्यासाठीही होतो. उत्तर कोरियाची आण्विक शस्त्र बनविण्याची योजना असल्याने त्याला त्यामुळे चुकीचा संदेश मिळू शकतो. या करारामुळे द. कोरियाला आण्विक इंधनासंबंधातील संशोधन करण्यास मर्यादित स्वातंत्र्य मिळाल्याचे समजते.

Next >>