Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

इटॉन, दिबाबा सर्वोत्तम ऍथलेट

ATH-Ashton-Eaton

जमैकाचा जगातील सर्वात जलद वेगवान धावपटू युसेन बोल्टला शर्यतीत जरी पराभव पत्करावा लागला नसला तरी त्याला वर्षातील सर्वोत्तम ऍथलेटच्या स्पर्धेमध्ये अखेर पराभव स्वीकारावा लागला. आंतरराष्ट्रीय हौशी ऍथलेटिक फेडरेशनतर्फे 2015 सालातील सर्वोत्तम पुरूष ऍथलिट म्हणून अमेरिकेच्या ऍस्टॉन इटोनची निवड करण्यात आली.

अमेरिकेच्या डेकाथलेट इटॉनने या प्रतिष्ठेच्या पुरस्कार शर्यतीत युसेन बोल्टला मागे टाकले. आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक स्पर्धेत युसेन बोल्ट आणि ख्रिस्टेन याना आपण पराभूत करू शकलो नसतो कारण ते नेहमीच दर्जेदार कामगिरी करत असतात.

शांघायमध्ये झालेल्या पहिल्या डेकॅथ्लॉन स्पर्धेत ऍस्टॉनने 9045 गुण नोंदवित यापूर्वी म्हणजे 2013 साली नोंदविलेला स्वतःचाच विश्व विक्रम मागे टाकला होता. 2015 च्या सर्वोत्तम ऍथलिट शर्यतीमध्ये इटॉन तसेच बोल्ट यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. 2015 च्या आयएएएफच्या सर्वोत्तम महिला ऍथलिटचा पुरस्कार गेंझेबी दिबाबाने पटकाविला. इथोपियाच्या दिबाबाने गेल्या जुलैमध्ये मोनॅकोत झालेल्या स्पर्धेत 1500 मी धावण्याच्या शर्यतीत नवा विश्व विक्रम केला होता. तिने बिजींगमधील स्पर्धेत 1500 मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत तिने कायस्यपदक घेतले होते. या निमित्ताने प्रतिवर्षी मोनॅकोत पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जातो. पण यावर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तेजक चाचणीची प्रकरणे अधिक वाढल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

Next >>