Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

चीनमध्ये प्राण्यांच्या क्लोनिंगचे सर्वात मोठे केंद्र

bird-ChinA

प्राण्यांचे क्लोनिंग करणारे सर्वात मोठे केंद्र 2016 मध्येच ईशान्य चीनमधील तियानजिन येथे सुरू होत आहे. एक प्रकारे तो प्राण्यांचा कारखानाच ठरणार आहे. बोयालाइफ या चिनी तर सुआम बायोटिक या दक्षिण कोरियाची प्राण्यांच्या क्लोनिंगमध्ये मक्तेदारी असून प्राण्यांचे मांस जास्त प्रमाणात मिळावे, यासाठी क्लोनिंग तंत्राने गायीम्हशींचे गर्भ तयार करून त्यापासून त्यांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय स्निफर कुत्रे, शर्यतीचे घोडे व इतर प्राण्यांचे क्लोनिंगही केले जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ५० कोटी डॉलर्स असेल. यात प्रयोगशाळा, जनुकपेढी व संग्रहालय यांचा समावेश आहे. क्लोनिंग केलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यास कितपत सुरक्षित असेल याबाबत प्रश्नच आहे.

१९ नोव्हेंबर २०१५ रोजी जनुकसंस्कारित सामन माशाच्या प्रजातीस खाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अॅाक्वाबाउंटी टेक्नॉलॉजीज या कंपनीने हा मासा तयार केला होता. चिनी वैज्ञानिकांनी मानवी भ्रूणाचे जनुक संपादनही केले होते. २३ एप्रिल २०१५ रोजी हा प्रयोग केला असता त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. गेल्या महिन्यात दक्षिण कोरियातील सोल येथे हाँग वू सक यांनीही असाच प्रयोग केला आहे. ओरेगॉन आरोग्य व विज्ञान विद्यापीठाने मानवी गर्भ त्वचापेशीपासून तयार केले आहेत, त्यात त्वचेच्या मूलपेशी दात्याच्या अंडपेशीत टाकण्यात आल्या व त्यातून गर्भाची निर्मिती करण्यात आली. झू यांच्या मते क्लोनिंग तंत्रज्ञान नवीन नाही. पण प्रत्येकाला त्याबाबत माहिती नाही, चीनमध्ये ज्या स्ट्रॉबेरी व केळी विकली जातात ती जनुकसंस्कारित आहेत. संत्र्यांच्या एका पेल्यातील रस दुसऱ्या पेल्यात ओतण्यासारखेच हे आहे. म्हणजे मूळ प्राणी व क्लोनिंग केलेला प्राणी किंवा वनस्पती यात काही फरक नसतो. काही लोकांना क्लोनिंग किंवा जनुकसंस्कारित अन्नाची भीती वाटते. चीनमध्ये लहान बाळांच्या अन्नपदार्थात मेलॅमाइन सापडले होते, त्यामुळे तेथे अशा अन्नपदार्थाबाबत खूपच साशंकता व्यक्त केली जाते.

Next >>