Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

युरोपातील सर्वांत मोठी बँक एचएसबीसी भारतातील खासगी बँकिंग व्यवसाय गुंडाळणार

HSBC

जागतिक बँकिंग क्षेत्रातील एचएसबीसीने भारतातील खासगी बँकिंग व्यवसाय गुंडाळणार असल्याची घोषणा केली. या व्यवसायातून बँक मालमत्ता व्यवस्थापन सेवा पुरवते. जागतिक स्तरावरील खासगी बँकिंग व्यवसायाचा धोरणात्मक आढावा घेतल्यानंतर भारतातील हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे.

एचएसबीसीच्या खासगी बँकिंग व्यवसाय विभागात शंतनु आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ७० लोक काम करत आहेत. या सर्वाना किरकोळ बँकिंग व्यवसायात सामावून घेण्यात येणार असल्याचे बँकेच्या अधिका-याने सांगितले. एचएसबीसीच्या मालमत्ता व्यवस्थापन सेवेंतर्गत असलेल्या निधीचा आकडा उपलब्ध होऊ शकलेला नाही. अंतर्गत ई-मेलद्वारे कर्मचा-यांना याची माहिती देण्यात आली. दोनच महिन्यांपूर्वीरॉयल बँक ऑफ स्कॉटलँडनेही खासगी बँकिंग क्षेत्रातून काढता पाय घेत आपला व्यवसाय विकला होता.

एचएसबीसीचा हा व्यवसाय मार्च २०१६ पर्यंत बंद केला जाईल. यातील निवडक ग्राहकांना जागतिक किरकोळ बँकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन व्यासपीठ एचएसबीसी प्रीमियरचा पर्याय देण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. बँकेकडून एचएसबीसी भारतात प्रीमियरमध्ये गुंतवणूक करणार असून त्यातून उत्पादने आणि सेवा विस्तारून त्या ग्राहकांना ऑफर करण्यात येतील, असे ते म्हणाले.

आयसीआयजेने केलेल्या तपासात २००७ पर्यंत १००० भारतीयांनी एसएसबीसी जिनिव्हात ४ अब्ज डॉलर ठेवल्याचे उघड झाले आहे. यानंतर या बँकेचा खासगी बँकिंग विभाग चौकशीच्या फे-यात अडकला आहे. मात्र या प्रकरणाचा भारतीय व्यवसाय बंद करण्याची संबंध नसल्याचे एका अधिका-याने स्पष्ट केले.

तसेच खर्च कपातीशीही याचा संबंध नसल्याचे त्याने म्हटले आहे. खर्च कपातीसाठी जागतिक स्तरावर बँकेने हजारो नोक-या कमी करण्याची आधीच घोषणा केली आहे. भारत हा व्यावसासिकदृष्टय़ा महत्त्वाचा देश असून बँकेकडून गुंतवणूक करणे सुरूच राहणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.

Next >>