Whats new

उस्मानाबाद राज्यातील पहिले 'वायफाय' शहर होणार

wifi

शहर ‘वायफाय’ने जोडण्यासाठी तब्बल 18 ठिकाणे निश्चिचत करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात आलेल्या प्रत्येक नागरिकाला याचा फायदा होणार आहे. इस्लामपूर शहरातील काही भाग वायफाय झोन झाला होता. उस्मानाबाद हे राज्यातील पहिले ‘वायफाय’ सेवा असणारे शहर असणार आहे.

शहराची भौगोलिक रचना लंबगोल आहे. सोलापूर औरंगाबाद या महामार्गाच्या बाजूने तसेच बार्शी औसा या रस्त्याच्या बाजूने शहराचा विस्तार वाढलेला आहे. या सर्व भागांत 18 ठिकाणे निश्चि त करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांपासून दीडशे मीटरच्या त्रिज्येमध्ये नागरिकांना वायफाय वापरण्यास मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात ‘वायफाय’ यंत्रणेचा लाभ मिळणार आहे. शहरात ज्या भागात नागरिकांची जास्त वर्दळ असते, अशी ठिकाणे या यंत्रणेने जोडली जाणार आहेत. त्यामुळे बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांनाही ‘वायफाय’ यंत्रणेचा फायदा होणार आहे.

इस्लामपूरमध्येही 10 हॉटस्पॉट देण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना ‘वायफाय’चा लाभ मिळत आहे. दरम्यान उस्मानाबाद हे राज्यातील एकमेव शहर वायफाय असणार आहे. सध्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही वायफाय यंत्रणा सुरू असून अद्याप ग्राहकांकडून चार्ज आकारले जात नसल्याचे बोलले जात आहे.

Next >>