Whats new

पी.व्ही. सिंधूची मकाऊ ओपनच्या विजेतेपदाची 'हॅटट्रिक'

P V SINDU

भारताची स्टार बॅडमिंटनपटू, पाचवी मानांकित पी व्ही सिंधू हिने मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बँडमिंटन स्पर्धेच्या विजयाची हॅटट्रिक केली आहे. सिंधूने जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव करत तिने सलग तिस-यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. सिंधू हिने मिनात्सूवर २१-९, २१-२३, २१-१४ अशी मात करत एक लाख २० हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या मकाऊ ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

दरम्यान जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात नववी मानांकित जपानची अकाने यामागुची हिचा काल पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. एक तास चाललेल्या कडव्या संघर्षात सिंधूने काल अकाने यामागुचीचा २१-८, १५-२१, २१-१६ ने पराभव करत २०१३ च्या योनेक्स जपान ओपनमध्ये यामागुचीकडून झालेल्या पराभवाचा हिशोबही चुकता केला.

Next >>