Whats new

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना 2015-क्रांती अग्रणी पुरस्कार जाहीर

RAGHUNATH MASHELKAR

भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व शेतकरी कष्टक-यांचे झुंजार नेते स्व क्रांतीअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा यंदाच्या मानाचा क्रांतीअग्रणी पुरस्कार आंतराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला. असुन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ देवानंद शिंदे यांच्या हस्ते त्यांना चार डिसेंबर प्रदान करणेत येणार आहे.

पुरस्काराचे हे 15 वे वर्ष असून समाजाच्या विकासासाठी विद्यार्थीपणे कार्य करणाऱया व्यक्तींचा आदर्श समाजातील सर्व घटकांना प्रेरणा देत रहावा या हेतूने सन 2000 पासून कतृत्वसंपन्न औद्योगीक व्यक्तीमत्वांचा क्रांतीअग्रणी जी.डी. बापूंच्या जयंतीदिनी चार डिसेंबर रोजी क्रांतीअग्रणी पुरस्कारने गौरव करणेत येतो. प्रतिवर्षी प्रमाणे यंदा हा पुरस्कार जागतीक किर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कुंडल येथे देणेत येणार आहे.

डॉ. माशलेकर यांनी सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक क्षेत्रात मौलीक संशोधन पेले आहे. त्यांची हळद व बासमती तांदूळ याची पेटंट मिळविण्यासाठीची न्यायालयीन लढाई तसेच खते, औषधे, जीवनोपयोगी रसायने, गृहीणीसाठी छोटे उद्योग स्थापन करणे संबधीचे त्याचे मार्गदर्शन असेल तसेच त्यांनी आतापर्यंत देशासाठी पेटंट मिळविली असून त्यांनी 264 हून अधिक संशोधन निबंध सादर केले असून त्यांची 27 पुस्तके व अनेक लेख प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना पद्मभुषण, पद्मश्री, रॉयल सोसायटी इंग्लंड यांची फेलो जेआरडी टाटा कार्पोरेट लिडरशीप अवॉर्ड शांतीस्वरुप भटनागर प्राईज, आदी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले असून त्यांना जगभरातीला विविध 34 विद्यापीठांनी त्यांना डीलीट पदवी देवून सन्मानीत केले आहे. तसेच शास्त्रीय व औद्योगीक संशोधनाबदद्ल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्वाच्या कमिटय़ावर चेअरमन व सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगीरी, सध्याही ते अनेक महत्वाच्या कमिटय़ावर कार्यरत आहेत. कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच व्यवस्थापन व प्रयोगशाळेतील संशोधनामध्येही आजही ते कार्यरत आहेत. त्यांनी पंतप्रधानांचे वैद्यानीक सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.

यापुर्वी नारायण सुर्वे, मेघा पाटकर, शबाना आझमी, डॉ. श्रीराम लागू, डॉ. शिवानंद सुरटूर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ.ह . साळुंखे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे

Next >>