Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

आशियाई एयर गन स्पर्धेत महिलाराज, हिना सिद्धू, श्वेता सिंगकडून सुवर्णपदकाची कमाई

Heena Sidhdhu

दिल्लीतील आठव्या आशियाई एयर गन चॅम्पियनशीपमध्ये भारताने आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताची नेमबाज हीना सिद्धूने सुवर्णपदक मिळवत भारताची मान उंचावली आहे.
दिल्लीच्या कर्णी सिंग शूटिंग रेंजवर सुरु असलेल्या या स्पर्धेत हीनानं 10 मीटर एयर पिस्तुल प्रकारात 197.8 गुणांची नोंद करत सुवर्णपदक मिळवलं. तर भारताच्याच श्वेता सिंगनं 197 गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकवलं.
कोरियाच्या सियॉन किमनं 175.8 गुणांची नोंद करुन कांस्यपदक मिळवलं. नवी दिल्लीत सुरु असलेल्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये अभिनव बिंद्रानेही सुवर्णपदकाची कमाई केली होती.
आशियाई एअरगन चॅम्पियनशिपमध्ये बुधवारचा दिवस भारतासाठी लाभदायक ठरला. भारताची स्टार नेमबाजपटू हीना सिध्दू व श्वेता सिंगने 10 मी एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली. भारताने एकूण 17 पदके जिंकत पदकतक्त्यात पहिले स्थान मिळविले.
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या हीना सिध्दूने चमकदार कामगिरी करताना 197.8 गुणासह सुवर्णपदक मिळवले. तर भारताच्याच श्वेता सिंगने 197 गुणासह रौप्य तर दक्षिण कोरियाच्या सेऊन ए किमने 175.8 गुणासह कांस्यपदक मिळवले. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेल्या यशस्विनी देशवालने शानदार प्रदर्शन करीत 155.3 गुण घेत चौथे स्थान मिळविले.
या स्पर्धेत भारताने एकूण 17 पदकांची कमाई करीत पहिले स्थान मिळविले. त्यात 6 सुवर्ण (2 वैयक्तिक वरिष्ठांनी मिळविलेली) पदकांचा समावेश आहे. याशिवाय भारताने पाच रौप्य व सहा कांस्यपदकेही मिळविली. एकंदर कामगिरीत इराणनने सहा सुवर्णासह 12 पदके मिळवित दुसरे तर तैपेईने एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदकांसह तिसरे स्थान मिळविले. हीनाने पात्र फेरीत यशस्विनी सिंग देशवालसह 387 गुण घेत अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर अंतिम फेरीत तिने 197.8 गुण घेत सुवर्णपदक निश्चित केले. या फेरीत तिला श्वेता सिंगकडून कडवा प्रतिकार झाला. श्वेताने या फेरीत 197 घेत रौप्य व कोरियाच्या किमने 175.8 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. नेमबाजीतील पॉवरहाऊस म्हणून ओळखल्या जाणा-या चीनने या स्पर्धेतून माघार घेतली तर अव्वल नेमबाज जिन जाँग ओहला न पाठविण्याचा निर्णय कोरियाने घेतल्याने या स्पर्धेतील चुरस बरीचशी कमी झाली होती.