Whats new

जागतिक निर्देशांकामध्ये भारत आघाडीवर

wef

जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेच्या जागतिक निर्देशांकामध्ये भारताने मोठी आघाडी घेतली आहे. चालू वर्षी भारताचे स्थान या निर्देशांकात 55 व्या क्रमांकावर आले आहे. मागील वर्षी भारत जागतिक निर्देशांकात 71 व्या स्थानावर होता. स्विर्त्झलंडने मात्र या यादीतील आपले स्थान कायम राखत चालू वर्षीही सर्वोच्चस्थान पटकावले आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ (डब्लूईएफ)ने दिलेल्या अहवालानुसार, भारतामध्ये आर्थिक सुधारणा वेगाने होत असून, देशातील संस्थांमध्ये वाढती स्पर्धेतही मोठी सुधारणा होत आहे. जगातील सर्वात प्रतिस्पर्धी अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये सलग सातव्यावर्षी स्विर्त्झलँडने आपले प्रथम क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे. त्यांनतर दुस-या स्थानावर सिंगापुर, तिस-या स्थानावर अमेरिका, चौथ्या स्थानावर जर्मनी आणि पाचव्या स्थानावर नेदरलँडचा समावेश आहे. याच यादीत सहाव्या स्थानावर जपान, सातव्या स्थानावर हाँगकाँग, आठव्या क्रमांकावर फिनलँड, नवव्या स्थानावर स्वीडन तर दहाव्या स्थानावर ब्रिटनचा समावेश आहे.

भारताची कामगिरी सर्वोत्तम
डब्ल्यूईएफच्या मते, भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी सर्वात प्रमुख समस्या म्हणजे भ्रष्टाचार, अनिश्चित धोरण, महागाई, सुलभ कर्जाची अनुपलब्धता हे होय. गुंतवणूकदारांची सुरक्षा, राष्ट्रीय बचत, गुणवत्तापूर्ण शिक्षण, खेळत्या भांडवलांची अनुप्लब्धता, नियुक्ती आणि निलंबन प्रक्रिया, जीडीपी, देशांतर्गत बाजाराचा आकार, राजकारण्यांवर जनतेचा असलेला विश्वास, कठोर सरकारी नियम याबाबतीमध्ये भारताची कामगिरी सर्वोत्तम आहे. या निर्देशांकामध्ये चीनचा क्रमांक 28 व्या स्थानावर आहे. संस्थेंच्या दरम्यान असलेल्या प्रतिस्पर्धेबाबत भारत 60 व्या क्रमांकावर आहे. तर पायाभूत सुविंधाबाबत देशाचा क्रमांक सहावा आहे. मागील वर्षी देश 81 व्या स्थानावर होता.