Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सानिया-मार्टिनाला वुहान ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

SANIYA MIRZA-MARTIN HINGIS

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाका कायम ठेवत या वर्षातील सातवे विजेतेपद पटकाविले आहे. सानिया व मार्टिन यांच्या जोडीने वुहान ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत इरिना कॅमेलिया बेगू-मोनिका निकुलेस्कू या जोडीचा 6-2, 6-3 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर या जोडीने सलग दोन डब्लूटीए स्पर्धांत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे.
सानिया व मार्टिनाच्या जोडीचे हे या वर्षातील सातवे विजेतेपद आहे. या दोघींनी उपांत्य फेरीच्या लढतीत तैवानच्या चौथ्या मानांकित चिंग चॅन-युंह यान चान जोडीचा 53 मिनिटांत 6-2, 6-1 असा पराभव केला होता.