Whats new

अध्यापनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात अध्यापनामध्ये दुसरे स्थान प्राप्त

savitribai phule pune university

देशातील सर्व पारपंरिक विद्यापीठात गुणवत्तेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. अध्यापनामध्ये देशात दुसरा, तर जगात 191 वा क्रमांक मिळाला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी येथे दिली. टाईम्स हायर एज्युकेशनतर्फे निश्चत केल्या जाणा-या विद्यापीठाच्या जागतिक पातळीवरील सन 2015-16 या वर्षाच्या गुणवत्तानिहाय क्रमवारीमध्ये पुणे विद्यापीठाने भाग घेतला होता. ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुणे विद्यापीठास 601 ते 800 या दरम्यानची क्रमवारी प्राप्त झाली आहे. विविध शैक्षणिक संस्थांबाबतच्या सखोल माहितीच्या काटेकोर विश्लेषणावर ही क्रमवारी आधारलेली असते.
अध्यापन, संशोधन, औद्योगिक संस्थांकडून प्राप्त होणारे उत्पन्न व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अध्यापन व संशोधनाबाबतचा दृष्टिकोन अशा विविध पातळीवरील कामाचे मूल्यमापन करून ही क्रमवारी दिली जाते. विद्यार्थी, संशोधन कार्य, संशोधनाची परिणामकारकता, आंतरराष्ट्रीय पातळीवरील दृष्टिकोन याबाबतची सखोल माहिती ही क्रमवारी निश्चत करण्यासाठी विचारात घेतली जाते.
अध्यापनात पुणे विद्यापीठाला देशात दुसरा व जगात 191 वा क्रमांक मिळाला आहे. आयआयटी वगळता सर्व भारतीय विद्यापीठात पुणे विद्यापीठा ने गुणवत्तेमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. पुणे विद्यापीठाने जगात 601 ते 800 या गटात क्रमवारी मिळविली आहे. ही विद्यापीठाची अतिशय उल्लेखनीय कामगिरी आहे.