Whats new

ताश्कंद डब्ल्युटीए महिलांच्या टेनिस स्पर्धेत हिबेनो अजिंक्य

HIBRENO

ताश्कंद खुल्या डब्ल्युटीए महिलांच्या टेनिस स्पर्धेत जपानच्या हिबेनोने क्रोएशियाच्या व्हेकिकचा 6-2, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये अंतिम सामन्यात पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. जागतिक महिला टेनिसपटूंच्या क्रमवारीत 117 व्या स्थानावर असलेल्या हिबेनोने आपल्या वेगवान खेळाच्या जोरावर व्हेकिकला नमविले. नेओ हिबेनोच्या वेगवान सर्व्हिससमोर व्हेकिकच्या अनेक चुका झाल्या. डब्ल्यूटीए टूरवरील हिबेनोचे हे पहिले विजेतेपद आहे. या स्पर्धेत रशियाच्या मार्गारिटा गॅस्पेरिन आणि पेनोव्हा यांनी महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविताना रशियाची डुश्चेनोव्हा यांनी झेकची सिनियाकोव्हा यांचा 6-1, 3-6, 10-3 असा पराभव केला.