Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

आशियाई बास्केटबॉल – चीन विजेता, भारत आठव्या स्थानी

 CHINA BASKET BALL TEAM

चीन येथे झालेल्या फिबा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कतारकडून भारताला 84-58 असे पराभूत व्हावे लागल्यानंतर भारताला आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. याआधी 2001 व 2003 मध्ये भारताला या स्पर्धेमध्येही आठवे स्थान मिळाले होते. यजमान चीनने फिलीपाईन्सला 78-67 असे पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. या जेतेपदासोबत चीनने पुढील वर्षी होणाऱया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली. तब्बल 12 वर्षानंतर बाद फेरीत प्रवेश करणाऱया भारताच्या युवा संघाने 11 दिवसांत 9 सामने खेळले. पण युवा संघाला कतारविरुद्धच्या लढतीत मात्र विजयासमीप पोहोचता आले नाही. अमज्योत सिंग, कर्णधार विशेष भृगुवंशी, अमृतपाल सिंग यासारख्या नवोदित खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. अमज्योतने सर्वाधिक 21 गुणाची कमाई केली तर अरविंदने 16 व विशेष भृगुवंशीने 10 गुण मिळवले. कतारतर्फे मोहम्मद हसनने सर्वाधिक 28 गुण तर अब्दुल्लाहने 16 गुण मिळवले. पहिल्या सत्रात कतारने 23-14 अशी आघाडी घेतली होती. दुसऱया सत्रानंतर ही आघाडी वाढवत 51-30 अशी केली. तिसऱया सत्रातदेखील कतारच्या खेळाडूंनी आगेकूच कायम ठेवताना 69-46 अशी आघाडी वाढवली. शेवटपर्यंत ही आघडी कायम ठेवत कतारने भारताला 84-58 अशा बास्केट्सनी मात दिली.