Whats new

डेव्हिड फेररचे मलेशियन खुल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद

 DAVID FERAR

स्पेनचा टॉप सीडेड टेनिसपटू डेव्हिड फेररने येथे मलेशियन खुल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना आपल्याच देशाच्या फेलीसियानो लोपेझचा पराभव केला. फेररच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे 25 वे विजेतेपद आहे.
फेरर आणि लोपेझ यांच्यातील हा अंतिम सामना अटीतटीचा झाला. पण फेररने आपल्या वेगवान आणि अचूक फोरहँड फटक्यावर लोपेझचे आव्हान 7-5, 7-5 असे संपुष्टात आणले. फेररने या जेतेपदाबरोबरच 170,600 डॉलर्स कमाई केली. या स्पर्धेत फिलीपिन्सचा हुये आणि फिनलँडचा काँटीनेन यांनी सलग दुसऱयांदा पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकाविताना अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा क्लेसन आणि अमेरिकेचा राजीव राम यांचा 7-6 (7-4), 6-2 असा पराभव केला.