Whats new

गरीब देशांमध्ये भारत श्रीमंत : जागतिक बँक

INDIA

भारतात 2012 च्या दरम्यान गरिबांची सर्वात जास्त संख्या होती. सद्या मात्र, इतर गरीब देशांच्या तुलनेत गरिबी दर सर्वात कमी आहे. ही माहिती जागतिक बँकेच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. अहवालानुसार, 2015 मध्ये जगभरातील अत्यंत गरीबीमध्ये राहणा-या लोकांची संख्या कमी होऊन 10 टक्के होऊ शकते. वर्ष 2012 मध्ये भारतात सर्वात जास्त गरीब राहत होते. मात्र, आता इतर गरीब देशांच्या तुलनेत येथील गरिबी दर सर्वात कमी आहे.
चीन, भारत, इंडोनेशिया आणि नायजेरियामध्ये सर्वात जास्त गरीब
मध्यम उत्पन्न असणा-या देशांमध्ये जगातील एक तृतीयांश गरीब आहेत. यामुळे सर्वात जास्त लोकसंख्या असणा-या चीन, भारत, इंडोनेशिया आणि नायजेरियामध्ये गरिबांचे सर्वात जास्त प्रमाण आहे.
'अतिदारिद्य्रातील' नागरिकांच्या संख्येत घट
अति दारिद्य्रातील नागरिकांची संख्या प्रथमच जागतिक लोकसंख्येच्या 10% पेक्षा कमी झाली असल्याचे जागतिक बॅंकेने सांगितले आहे. जागतिक बॅंकेने गरिबीची सुधारित व्याख्या तयार केली आहे. अतिदारिद्य्ररेषेखालील लोकांच्या संख्येत घट झाल्याने आनंद वाटत असल्याचे जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम यॉंग किम यांनी सांगितले. जागतिक बॅंकेने यापूर्वी दिवसाला 1.25 डॉलरपेक्षा कमी पैशांत उदरनिर्वाह करणा-या लोकांचा समावेश ‘अतिदारिद्य्ररेषेखालील व्यक्ती ’ असा केला होता. आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता 1.90 डॉलर ही दारिद्य्ररेषा निश्चित करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेने निर्धारित केलेल्या नवीन दारिद्य्ररेषेनुसार, 2015 मध्ये 70.2 कोटी लोक म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या 9.6% लोकसंख्या "अतिदारिद्य्रात‘ होती. 2012 मध्ये 90.2 कोटी लोक (12.8%) दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत होते. गेल्या महिन्यात झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत 193 देशांनी 2030 पर्यंत गरिबी संपविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.