Whats new

लाखांच्या व्यवहारांसाठी पॅन सक्ती

PAN CARD

परदेशातील काळा पैसा भारतात आणण्यात मोदी सरकारला अद्याप यश आले नसताना आता देशांतर्गत काळय़ा पैशावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता एक लाखांपेक्षा जास्त रकमेच्या खरेदी आणि विक्री व्यवहारांसाठी पॅनकार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. काळया पैशांवर अंकुश ठेवण्यासाठी आयकर विभागाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी जीएसटीची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे. सोन्याच्या प्राथमिक खरेदी व्यवहारांमध्ये सिमा शुल्क अदा केले जाते. मात्र, त्यांनतरचे व्यवहार रोखीनेच केले जातात. पॅन सक्ती झाल्यास अशा स्वरूपांच्या व्यवहारांची माहिती समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यापुढे एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड सोबत ठेवावे लागणार आहे.