Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

भारत गाठेल 7.5 टक्के विकासदर - आयएमएफ

 IMF

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ इतर विकसनशील देशांच्या तुलनेत वेगाने होणार असून चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.5% राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून (आयएमएफ) व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे चीनच्या विकासाचा दर 6.3% असेल असे सांगण्यात आले आहे.
"भारताचा विकासदर येत्या संपूर्ण वर्षासाठी 7.5% राहील. धोरणातील नुकतेच बदल, देशातील गुंतवणुकीत होणारी वाढ व कमोडिटीजच्या घटलेल्या किंमतींचा देशाच्या विकासाला फायदा होणार आहे", असे आयएमएफच्या अहवालात म्हटले आहे.
मागील वर्षी तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकासदर 7.3% होता. दुसरीकडे आयएमएफने आर्थिक वर्ष 2016 साठी चीनच्या विकासदराचे लक्ष्य घटवून 6.3% केले आहे. तसेच वर्ष 2015 साठी जागतिक अर्थवाढीचा दर 3.1% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.