Whats new

तकाकी काजिता - आर्थर बी मॅक्डोनाल्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

 NOBEL

विश्‍वात सापडणाऱ्या अतिलघू अशा न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते, असा शोध लावणारे जपानचे संशोधक तकाकी काजिता आणि कॅनडाचे संशोधक आर्थर बी मॅक्‍डोनाल्ड. यांना या वर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते या शोधामुळे पदार्थाच्या सगळ्यात छोट्या कणाचे कार्य कसे चालते, याची कल्पना जगाला आली आणि त्याचबरोबर जगाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या अभ्यासाचे नवे दालन खुले झाले, असे रॉयल स्वीडीश अॅकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
पोटान्सच्या खालोखाल न्यूट्रिनो कण सर्वाधिक प्रमाणात आढळतात. हजारो न्यूट्रिनो कण आपल्या शरीरातून प्रवाहित होत असतात. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबतची अत्यंत कमी माहिती आपल्याला होती. तकाकी काजिता आणि आर्थर बी मॅक्‍डोनाल्ड यांनी ‘न्यूट्रिनो ऑस्सिलेशन’ ची पद्धत शोधून काढली. त्यातून त्या कणांची अधिक माहिती मिळण्यास मदत झाली.

शास्त्रज्ञांचा अल्पपरिचय :
56 वर्षीय काजिता या जपानमधील काशिवा येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ टोकिओ’मध्ये कार्यरत आहेत. तर 72 वर्षीय मॅक्डोनाल्ड हे कॅनडामधील किंग्सटन येथील ‘क्वीन्स युनिव्हर्सिटी’मध्ये कार्यरत आहे. पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांना सहा कोटी 27 लाख रुपये एवढी रक्कम विभागून देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जपान आणि अमेरिका येथील शास्त्रज्ञांना एलईडीवरील संशोधनासाठी फिजिक्स नोबेल देण्यात आले होते.