Whats new

किर्लोस्कर इंजिन्सला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

 kirloskar

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (केओइएल) या भारतातील आघाडीच्या डिझेल इंजिन व जनरेटिंग सेट्स कंपनीला. ईईपीसी इंडियाने सलग सातव्या वर्षी स्टार परफॉर्मर पुरस्कार देऊन गौरविले आहे. ही एक दुर्मिळ बाब असून, आतापर्यंत फार थोडय़ा कंपन्यांनी एकाच प्रकारचा पुरस्कार सलग इतक्यांदा पटकावला आहे. दरवर्षी भारत सरकारच्या दळणवळण आणि उद्योग मंत्रालयातर्फे हा पुरस्कार विविध क्षेत्रांतील कंपन्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो. मुंबईत झालेल्या सोहळ्य़ात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केओइएलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आर. आर. देशपांडे आणि मिलिंद एम. पाणदरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. भारतीय निर्यातदारांमध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्सची, इलेक्ट्रीक मोटर्स, जनरेटर्स ऍण्ड ट्रान्सफॉर्मर्स आणि पार्टस् या विभागातील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याबाबत बोलताना देशपांडे म्हणाले, सातत्यपूर्ण आणि सक्रिय नियोजन, धोरणात्मक कृती केल्याने आम्ही जागतिक पातळीवर इंजिनीअरिंग सोल्यूशन्स पुरवणा-या मोठय़ा कंपन्यांपैकी एक झालो आहोत. सलग सातव्यांदा मिळालेला हा पुरस्कार आमची बांधिलकी आणि आम्ही कार्यरत असलेल्या सर्व भागांतून ग्राहकांचा आमची उत्पादने व सेवांना मिळणाऱया प्रचंड प्रतिसादाचे प्रतीक आहे.