Whats new

एअरफोर्स डे : IAF चीफ म्हणाले, युद्ध पथकांमध्ये आता महिला पायलट

AIR FORCE DAY

एअरफोर्सच्या युद्ध पथकांमध्ये आता महिला पायलेटचाही समावेश असणार आहे. एअरफोर्स चीफ अरुप राहा यांनी याबाबत घोषणा केली. हिंडन एअरबेसवर एअरफोर्स डे सेलिब्रेशन कार्यक्रमसाठी ते जवानांबरोबर उपस्थित होते. इंडियन एअरफोर्स आज 83 वा एअरफोर्स डे साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जवानांनी परेड काढली. स्काय डायव्हींगपासून ते अॅरोबॅटिक्सचे सादरीकरण करत जवानांनी सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले.

असे झाले सेलिब्रेशन..
- इव्हेंटची सुरुवात तीन Mi-17 V5 हेलिकॉप्टर्सच्या फ्लाय पास्टद्वारे झाली. हे हेलिकॉप्टर गाझियाबादच्या एअरबेसवरून V शेप तयार करत हवेत झेपावले.
- या इव्हेंटमध्ये आकाश गंगा अॅरोबेटिक स्क्वॉर्डनने स्काय ड्रायव्हर्सने हवेत करामती दाखवल्या.
- या आकारात तीन हर्क्युलस C-130J नेही उड्डाण घेतले.
- याचवर्षी एअरफोर्स डे सेलिब्रेशनमध्ये सर्वात मोठे सादरीकरण सूर्या किरण एरोबॅटिक टीम (एसकेएटी) चे होते. त्यांनी प्रथमच हे सादरी करण केले. या स्क्वॉर्डन एयरक्राफ्टच्या कमतरतेमुळे चार वर्षांपूर्वी ते बंद करण्यात आले होते.