Whats new

पाणलोट योजनेस केंद्र सरकारची मंजुरी

panlot yojna

शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेचे सहकार्य असणा-या पाणलोट योजनेस मंजुरी दिली आहे. ह्या योजनेवर जवळपास 2,140 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या योजनेस मंजुरी देण्यात आली. आर्थिक समितीनेही जागतिक बँकेचे सहकार्य घेतलेल्या राष्ट्रीय पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प ‘नीरांचल’ यासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी 2142.30 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित प्रकल्प राष्ट्रीय असली तरी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.