Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

ट्युनिशियाच्या 'द क्वार्टलेट' ला शांततेचे नोबेल

2015 – peace nobel prize

ट्युनिशियामध्ये 2011 मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर अराजकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशात लोकशाही टिकविण्यात भरीव कामगिरी. केलेल्या ‘नॅशनल डायलॉग क्वार्टलेट’ या संस्थेला यंदाचे शांततेचे नोबेल पोरतोषिक जाहीर झाले आहे. ट्युनिशियामध्ये झालेल्या या सकारात्मक बदलाचा आदर्श इतर देशांनीही घ्यावा, यासाठीही हे पारितोषिक दिले असल्याचे नोबेल निवड समितीने म्हटले आहे.
ट्युनिशियामधील लोकशाहीचे संरक्षण केल्याबद्दल ‘नॅशनल डायलॉग क्वार्टलेट’ ला हा सन्मान मिळणे उचितच असून शांतता आणि लोकशाहीचा पुरस्कार करण्यासाठी आखाती देश, उत्तर आफ्रिका आणि इतर देशांनी ट्युनिशियापासून प्रेरणा घ्यावी, असे निवड समितीने म्हटले आहे. ट्युनिशियातील चार प्रमुख संस्थांची मिळून द क्वार्टलेट ही संस्था बनली आहे. यामध्ये द ट्युनिशियन जनरल लेबर युनियन, द ट्युनिशियन कॉन्फडरेशन ऑफ इंडस्ट्री ट्रेड अँड हॅंडिक्राफ्ट्स, द ट्युनिशियन ह्युमन राइट्स लीग आणि द ट्युनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स यांचा समावेश आहे. या सर्व संस्थाद्वारे ट्युनिशियातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांमध्ये मानवाधिकार, कायद्याचे पालन, समाजकल्याण अशा मूल्यांचा प्रसार केला जातो. द क्वार्टलेट या संस्थेने आपल्या नैतिक सामर्थ्याच्या जोरावर ट्युनिशियामध्ये शांततापूर्ण मार्गाने लोकशाहीचा विकास होण्यासाठी प्रमुख माध्यम म्हणून काम केले असल्याचे निवड समितीने पारितोषिक जाहीर करताना म्हटले आहे. हा पारितोषिकामुळे ट्युनिशियातील जनतेचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. द क्वार्टलेटसह इतर क्षेत्रातील नोबेल मिळालेल्या सर्व विजेत्यांना 10 डिसेंबरला पारितोषिक वितरण होणार आहे.
शांततेच्या नोबेल पारितोषकासाठी यंदा ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांची नावे चर्चेत होती. मात्र, या सर्वांना टाळून ‘जस्मिन क्रांती’ म्हणून ओळखल्या जाणा-या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा प्रसार करून शांतता निर्माण करणा-या द क्वार्टलेटची समितीने निवड केली. चार संस्थांनी मिळून बनलेल्या या संस्थेची स्थापना 2013 ला करण्यात आली. राजकीय हत्यासत्र आणि देशात पसरलेल्या अराजकतेमुळे लोकशाही प्रक्रिया संकटात सापडली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्थापना झाली होती. या संस्थेने शांततापूर्ण मार्गाने समाजातील अशांत घटकांबरोबर चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. ट्युनिशियाअंतर्गत यादवीच्या उंबरठ्यावर असताना या संस्थेने पर्यायी राजकीय चर्चेचे वातावरण तयार केले.
नॅशनल डायलॉग क्वार्टेट : द टय़ुनिशियन जनरल लेबर युनियन. स्थापना – १९४६, कार्य – कामगारांच्या हिताचे रक्षण करणे. द टय़ुनिशियन कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्री, ट्रस्ट अँड हँडीक्राफ्ट्स. स्थापना – १९४७, कार्य – लघुद्योगांमध्ये सहभाग. द टय़ुनिशियन ह्य़ूमन राइट्स लीग. स्थापना – १९७६, कार्य – मानवी हक्कांचे रक्षण. द टय़ुनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स. कायदेतज्ज्ञांच्या या संस्थेने टय़ुनिशियामध्ये लोकशाही प्रस्थापनात महत्त्वाचा सहभाग नोंदविला होता.
जस्मिन रिव्होलुशन : ट्युनिशियामध्ये 2010 मध्ये सरकारविरोधी वातावरण तयार होऊन ही लाट सर्व अरबजगतात पसरली. म्हणूनच उठावांना ‘अरब स्प्रिंग’ म्हणूनही ओळखले जाते. ट्युनिशियामध्ये याला ‘जस्मिन रिव्होलुशन’ म्हणतात. ट्युनिशियामध्ये सुरवात होऊनही दोन वर्षांत येथे चर्चेची प्रक्रिया सुरू झाली. या उलट सीरिया, येमेन आणि इतर अरब देशांमध्ये सरकार उलथविले गेले अथवा तसे प्रयत्न होऊन अराजकता माजली. द क्वार्टलेटने मात्र देशाच्या इस्लामवादी आणि इतर पक्षांमध्ये राष्ट्रीय चर्चा घडवून आणली. त्यामुळे येथे लोकशाही वाचू शकली.