Whats new

राष्ट्रपतींना पश्चिम आशिया दौ-यात तीन डॉक्टरेट पदवी

president pranav mukarjee

सहा दिवसांच्या पश्चिम आशियाच्या दौ-यावर जाणा-या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना जॉर्डन, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील प्रमुख विद्यापीठांकडून तीन डॉक्टरेट ही पदवी प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. सर्वप्रथम जॉर्डन विद्यापीठाकडून मुखर्जी यांना राज्यशास्त्र या विषयातील पदवी देण्यात येणार आहे. मुखर्जी यांनी भारत आणि पॅलेस्टाईन या देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांचा सन्मान करणे हा आपल्या अभिमानाचा विषय आहे, असे पॅलेस्टाईनच्या अल-काऊद या विद्यापीठाने सांगितले. भारताने पॅलेस्टाईनमध्ये शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे यावेळी सांगण्यात आले. पॅलेस्टाईनमध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी भारतातील अनेक मान्यवर यावेळी राष्ट्रपतींबरोबर जाणार आहेत.
तसेच जगभर उच्च शिक्षणासाठी प्रसिद्ध असणा-या हिबु जेरुसलेम विद्यापीठाकडूनही मुखर्जी यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मुखर्जी या आठवडय़ाच्या शेवटी इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन प्रतिस्पर्धी देशांना भेटी देणारे पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत