Whats new

अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष - शेखर बसू

shekhar basu

भारताच्या पहिल्या जल अणुभट्टीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची केंद्रीय सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या पदावर अवघ्या ११ महिन्यांचा कार्यकाळ लाभणार आहे. डॉ. बसू सध्या भाभा अणू संशोधन केंद्रात (बीएआरसी) संचालक असून, अणू पुनर्वापर मंडळाचे (एनआरबी) मुख्य कार्यकारी आहेत. सध्या अणू कार्यक्रमाचे प्रमुख असलेले डॉ. आर.के. सिन्हा २३ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत असून, त्यांच्याकडून बसू सूत्रे हाती घेतील. कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन पुन:प्रक्रिया सुविधा प्रकल्प स्थापन करण्यात डॉ. बसूंची मुख्य भूमिका आहे.