Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

के. पी. शर्मा ओली यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड

K P SHARMA OLI

नेपाळच्या नव्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली यांची निवड करण्यात आली आहे. 63 वर्षीय ओली यांनी माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव केला. देशभरात नवी राज्यघटना लागू करण्यात आल्यावर उसळलेल्या दंग्यांना नियंत्रित करण्यात अपयश आल्याने कोईराला यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामबरण यादव यांच्याकडे सादर केला होता.

नेपाळच्या संसदेत पार पडलेल्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे अध्यक्ष ओली यांनी 338 मते मिळाली, तर माजी पंतप्रधान कोईराला यांना 249 मते मिळाली. पंतप्रधानपदी निवड होण्यासाठी 299 मते मिळणे आवश्यक होती. मतदानाच्या वेळी सर्व 587 संसद सदस्य उपस्थित होते. यावेळी सदस्यांना तटस्थ राहण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. ओली यांना राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी-नेपाळ, मधेशी जनाधिकार फोरम-डेमोक्रॅटिक आणि युसीपीएन-माओवादी यांसह अन्य लहान 14 पक्षांचा पाठिंबा होता. गेल्यावर्षी ओली यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यापूर्वी ते पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते.

2006 च्या चळवळीनंतर स्थापन करण्यात आलेल्या गिरिजा प्रसाद कोईराला यांच्या नेतृत्त्वाखालील हंगामी सरकारमध्ये ओली यांनी देशाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री होते. 1966 मध्ये राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केलेले ओली हे 1991, 1994 आणि 1999 मध्ये झापा जिल्हय़ातील विविध मतदार संघातून निवडून आले होते. सध्या नवीन राज्यघटना लागू करण्यात आल्याने देशभरात हिंसेचे वातावरण आहे. गेले काही महिने चालू असलेल्या आंदोलनात किमान 40 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मूळचे भारतीय असलेल्या मधेशी लोकांनी मधेशी आणि थारु समुदायासह अन्य अल्पसंख्यांकांना कोणतेही अधिकार देण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे.