Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सानिया-हिंगीसचे चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद

SANIYA MIRZA- MARTINS HINGIS

सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीस हिच्या साथीत नववे विजेतेपद मिळविले. या जोडीने चायना ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी तैवानच्या हाओ-चींग आणि युंग-जॅन या चॅन भगिनींच्या जोडीवर ६-७ (९-११), ६-१, १०-८ अशी मात केली. त्यांचे हे सलग चौथे विजेतेपद आहे. पहिला सेट ६७ मिनिटे चालला. टायब्रेकमध्ये चॅन भगिनींनी २-५ पिछाडी भरून काढली. त्यांनी ५-६ व ७-८ अशा स्थितीस दोन सेटपॉइंट वाचविले. हा सेट जिंकून त्यांनी सुरूवात चांगली केली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्यांना एकच गेम जिंकता आला. सानिया-हिंगीसने मॅच टायब्रेकमध्ये अनुभव पणास लावला.