Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

मुंबईच्या अजय जयरामला 2015 चे डच बॅडमिंटन विजेतेपद

AJAY JAYRAM

मुंबईच्या अजय जयरामने डच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तीन आठवड्यांपूर्वी कोरियन बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेत उपविजेतेपद जिंकलेल्या अजयने एकतर्फी अंतिम लढतीत बाजी मारली.

तिसऱ्या मानांकित अजयने बाराव्या मानांकित राऊल मस्ट याचा 21-12, 21-18 असा 34 मिनिटांत पराभव केला. चेंबूरमध्ये जन्मलेला तसेच तिथेच बॅडमिंटनचे धडेही गिरवलेला अजय चार वर्षांपूर्वी मस्टविरुद्ध पराजित झाला होता; मात्र तो इतिहास होता हे दाखवताना अजयने एकतर्फी हुकूमत राखली.

पहिला गेम सहज जिंकल्यावर अजय दुसऱ्या गेममध्ये 4-0 आघाडीनंतर 5-6, 6-7 असा मागे पडला होता, पण त्याने सलग तीन गुण जिंकत घेतलेली आघाडी त्यानंतर कधीही गमावली नाही आणि पुन्हा एकदा डच ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

या स्पर्धेतील अजय सर्वोत्तम मानांकित खेळाडू होता. त्यानुसार खेळ केल्यामुळे अजय खूश होता. अंतिम फेरीत सरस मानांकित खेळाडू असल्याचे दडपण होते. चांगला खेळ झाल्यामुळे अजय खूश होता. अंतिम लढतीत चांगली सुरुवात झाली. दुसऱ्या सेटमध्ये मोक्याच्या वेळी जिंकलेले गुण निर्णायक ठरले. या यशाच्या अनुभवाचा जास्त खडतर डॅनिश चॅलेंजर स्पर्धेत फायदा होईल अशी आशा आहे.