Whats new

भारत रशियन एस-400 ‘Triumf’ची खरेदी करणार

Defence

भारतने आपली ‘हवाई सुरक्षा’ वाढविण्यासाठी रशियाच्या नवीन क्रांतीतील एस-400 ‘Triumf’ वायू सुरक्षा क्षेपणास्त्र खरेदी करण्याची योजना बनविली आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून 400 किलोमीटर परिसरात येणा-या एअरक्राफ्ट, फायटर जेट्स, स्टील्थ प्लेन, क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो. अशा पद्धतीची 12 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची योजना आहे. मुख्य म्हणजे चीनने एका वर्षापूर्वी अशाप्रकारची 6 एस-400 क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी रशियाशी 3 बिलियन डॉलरचा करार केला आहे.

अलीकडेच भारतीय हवाई दलाने या संरक्षण पद्धतीच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील ‘संरक्षण संमती समिती’ने या प्रस्तावावर काम सुरू केले आहे.

एस-400 मारा 400 किमीपर्यंत : रशियाच्या एस-400 सुरक्षा यंत्रणेत वेगवेगळय़ा क्षमतेची तीन क्षेपणास्त्र आहेत. हे सुपरसोनिक आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र असून याची 120-400 किलोमीटरच्या अंतरात येणा-या कोणत्याही हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याची क्षमता आहे. तसेच एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणा जमिनीवरुन हवेत मारा करुन रडारवर पकडण्यात न येणा-या स्टील्थ मोडच्या अमेरिकन एफ 35 फायटर जेटला सुद्धा खाली पाडू शकते, असा दावा रशियन संरक्षण तज्ञांनी केला.