Whats new

चीन टेनिस स्पर्धेत मुगुरूझाला एकेरीचे अजिंक्यपद

Garbine-Muguruza

स्पेनच्या गार्बेनी मुगुरूझाने चीन येथील खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकावून महिला टेनिसपटूंच्या ताज्या नामांकन यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. मुगुरूझाच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे सर्वात मोठे विजेतेपद म्हणावे लागेल.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 22 वर्षीय मुगुरूझाने स्वित्झर्लंडच्या बॅसिनझिकायचा 7-5, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील मुगुरूझाचे हे दुस-या विजेतेपद असून गेल्या वर्षी तिने होबार्ट टेनिस स्पर्धा जिंकली होती. 2015 च्या टेनिस हंगामात मुगुरूझाने दोन स्पर्धामध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. चीन खुली महिलांची टेनिस स्पर्धा जिंकणारी मुगुरूझा ही सर्वात तरूण महिला टेनिसपटू आहे.